फलटण : फलटण तालुक्यातील सासकल ता. फलटण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सोनाली मदने यांची निवड झाली आहे. आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा एक मत जादा मिळवल्याने उपसरपंच पदाची माळ मदने यांच्या गळ्यात पडली आहे.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३३ अन्वये तहसिलदार, फलटण यांच्या आदेशाने सासकल येथील रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूकी प्रक्रिया पार पडली. या उपसरपंच पदाच्या निवडीत भैरवनाथ पॅनलच्या सोनाली मदने यांना ५ मते मिळाली तर त्यांच्या विरुद्ध असलेल्या ग्रामविकास गटाच्या नीलम वैभव सावंत यांना ४ मते मिळाल्याने मदने या एका मताने विजयी झाल्या.
या वेळी सरपंच उषा फुले, ग्रामपंचायत सदस्य हणमंतराव मुळीक, चांगुणाबाई मुळीक, लक्ष्मीबाई आडके, सोनाली मदने, राजेंद्र घोरपडे, मोहन मुळीक, लता मुळीक, नीलम सावंत यांची उपस्थिती होती.
यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून मंडल अधिकारी एन. बी. नाळे यांनी काम पहिले.
उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सोनाली मदने यांचे सरपंच उषा फुले, माजी सरपंच लक्ष्मण मुळीक, सोपान मुळीक, रघुनाथ मुळीक, सदानंद मुळीक, किरण घोरपडे, मोहनराव मुळीक (पाटील), दत्तात्रय दळवी, सुनील चांगण आदी मान्यवरांसह सासकल ग्रामस्थांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे.