फलटण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत जाहीर

फलटण : फलटण तालुक्यातील २२ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत नुकतीच पंचायत समिती सभागृहात काढण्यात आली, यामध्ये अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला तर अनेक ठिकाणी महिलाराज येणार असल्याचे जाहीर होताच काहींचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले.
मिरेवाडी (दलवडी), माळेवाडी (अनुसूचित जाती महिला), जोर कुरवली खुर्द (अनुसूचित जमाती महिला), विठ्ठलवाडी, उळूंब, जोर वाखरी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), चांभारवाडी, परहर खुर्द टाकुबाईचीवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), गोखळी, ढवळेवाडी (आसू), तरडगाव, शिंदेमाळ, खडकी, माझेरी, सासवड (सर्वसाधारण), आसू, दालवडी, गोळेवाडी, मिरगाव, खटकेवस्ती, गोळेगाव (सर्वसाधारण महिला) या प्रमाणे आरक्षण निश्चित झाली आहेत.
प्रभाग रचना पूर्ण होऊन फॉर्म ब प्रसिद्ध झाले आहेत, फॉर्म अ प्रसिद्ध होऊन या २२ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामध्ये सरपंच निवड थेट मतदारांमधून होणार आहे.
तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, महसूल नायब तहसिलदार तुषार गुंजवटे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, योगेश धेंडे यांचेसह विविध गावाचे मावळते सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व राजेगटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!