क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही प्रेरक व ऊर्जा देणारे : आमदार सचिन पाटील

फलटण : क्रांतिज्योती सवित्रीबाई यांनी महात्मा फुले यांच्या बरोबर स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य महिलांसाठी आजही प्रेरणास्त्रोत आहे. फुले दाम्पत्यांचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रातले कार्य आज इतक्या वर्षांनी देखील प्रेरक व ऊर्जादायी देणारे ठरते असे प्रतिपादन आमदार सचिन पाटील यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त संत सावतामाळी महाराज मंदिर, फलटण येथे महात्मा फुले जयंती उत्सव समिती व क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन करताना आ. पाटील बोलत होते.
            यावेळी जयंती उत्सव समितीचे प्रमुख गोविंद भुजबळ, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक साताराचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे, समता परिषद फलटणचे अध्यक्ष बापुराव शिंदे,  बाळासाहेब ननावरे, संत सावतामाळी मंदिर ट्रस्टचे संचालक विजय शिंदे, रणजित भुजबळ, विकास नाळे, राहुल शिंदे, वैभव नाळे, अतुल फरांदे, दत्ता नाळे, रोहन शिंदे, सिद्धेश भुजबळ, माधुरी भुजबळ, सुजाता शिंदे, रोहिणी कचरे, हिराबाई भुजबळ, मेघा भुजबळ, किरण राऊत, संदीप नेवसे, बंडू शिंदे, ज्योतिबा घनवट आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी आमदार सचिन पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संखेने रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान केले. यामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!