महाराष्ट्र पाहायला येईल असे आदर्शवत काम फलटण मतदार संघात करणार ; अमित रणवरे यांचा उपक्रम अभिमानास्पद – रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण : उभा महाराष्ट्र या मतदार संघातील कामे पाहावयास येईल असे आदर्शवत काम आपण फलटण विधानसभा मतदार संघात करून दाखवू,
जाती भेदाच्या व पक्षीय भिंती भेदून आपण सर्वजण विकासासाठी एकत्र येऊन काम करूयात असे आवाहन करीत अमित रणवरे यांनी राबविलेला उपक्रम अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

निंभोरे ता. फलटण येथील निंभोरे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अमित रणवरे व त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री रणवरे यांच्या वाढदिवसानिमित्त निंभोरे येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप, अंगणवाडीच्या मुलांसाठी वॉटर बॅग, दीड हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शालेय साहित्याचे वाटप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासो इवरे, सुरवडीच्या सरपंच शरयू साळुंखे-पाटील, जिल्हा विकास व नियोजन समितीचे माजी सदस्य दत्ताभाऊ धुमाळ, तुकाराम शिंदे, प्रशांत गायकवाड, शुभम नलवडे, अशोकराव जाधव, अमरसिंह नाईक निंबाळकर, संतोष गावडे, राजेंद्र काकडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
राजकारणात चढ उतार येत असतात. पुरुषार्थ हा नेहमी कर्तृत्वाने गाजवायचा असतो. समाजाला आपण काहीतरी देणं आहे याच भान आपल्याला असायला हवे. चांगल काम करणाऱ्याच्या पाठीशी परमेश्वर नेहमी राहतो. अगामी काळात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे चांगली वेळ व चांगला काळ आल्याचे चित्र भविष्यात नक्की दिसेल. फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देत निंभोरे गावावर आपले विशेष प्रेम व अभिमान आहे. या गावापासून माझ्या कर्तृत्वाची सुरुवात झाली. याच गावचा म्हणून मला दिल्ली मध्ये जाता आले असे निदर्शनास आणून देत वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगला उपक्रम अमित रणवरे यांनी राबवीला आहे. त्यांच्यावतीने पंचवीस सायकलीचे वाटप होत आहे, त्यामध्ये आणखी पंचवीस सायकली आपण देत असून आता एकूण पन्नास सायकलीचे वाटप होईल असे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले. या पन्नास सायकलीचे वाटप करताना गाव, सीमा, मतदान, राजकारण अशा बाबी न पाहता गरजू विद्यार्थिनींना प्राधान्य द्यावे असे ही त्यांनी आवर्जून सांगितले.

अमित रणवरे यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने आयोजित केलेला गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटपासारखा असामान्य उपक्रम समाधानकारक व कौतुकास्पद आहे. रणजितसिंह यांचा एक छोटा परंतु मनाने मोठा असलेल्या सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील मुलगा असणाऱ्या अमित रणवरे यांचे दातृत्व व सेवाभावी वृत्ती या उपक्रमाद्वारे दिसून येते असे सांगून आमदार सचिन पाटील यावेळी म्हणाले, जनतेने मला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे, त्या संधीचे आपण निश्चितपणे सोने करू.
यावेळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत दोनशे मिटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल समृद्धी कदम हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

“अगामी काळातील सर्व निवडणुका जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे -पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते म्हणून लढवणार आहोत. विधानसभा निवडणूक जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे -पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली लढलो. अगामी निवडणुकामधील संपूर्ण व्यूव्हरचना तात्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाईल. अगामी काळात गुलाल आणण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही” असे रणजितसिंह यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

“निंभोरे गावाने विधानसभा निवडणुकीत मला आशीर्वाद दिला आहे. या गावातील भैरवनाथ मंदिराच्या सभामंडपासाठी आपण दहा लाखाचा निधी जाहीर करत आहोत. लवकरच या कामाला मंजुरी मिळेल. निंभोरे गावातील वाडया-वस्त्यावरील रस्ते, पाणंद रस्ते, पाणी, आरोग्य, जिल्हा परिषद शाळा आदी सर्व प्रश्न हातामध्ये घेऊन ते लवकरात लवकर सोडविण्यास आम्ही प्राधान्य देवू” असे आमदार सचिन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमास निंभोरे ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!