फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय, फलटणच्या कृषीदूतांनी पाडेगाव ता.खंडाळा येथे ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२०२५ कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना किटकनाशक फवारणीवर प्रात्यक्षिक दिले.
कृषिदूत धनंजय इंगोले, सौरभ काटकर, रोहन कांबळे, राहूल केसकर, शिवतेज रणवरे, श्रीजीत धुमाळ व आदित्य गोडसे यांनी पाडेगाव येथील सचिन सोनलकर यांच्या शेतातील गहू पिकावरील मावा, तुडतुडे नियंत्रणासंबंधित कीटकनाशक फवारणी कशी करावी याबाबतचे फवारणी संरक्षण किट वापरून प्रात्यक्षिक दिले. तसेच फवारणी वेळी शेतकऱ्यांनी कोणती आवश्यक काळजी घ्यायची याबाबत सविस्तर माहिती दिली.
कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, प्रा. नितिशा पंडित, प्रा. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.