फलटण : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (वय ९२) यांचे आज (दि. २६) रोजी रात्री दहा वाजता दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले.
गुरुवार दि. २६ डिसेंबर रोजी घरी अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तात्काळ उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रात्री दहा वाजता त्यांचे निधन झाले असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जाहीर केले.
डॉ. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ असा सलग दहा वर्षे देशाचे चौदावे पंतप्रधान म्हणून कार्यकाल पहिला. विद्वान, मृदू व मितभाषी अशी ओळख असणाऱ्या मनमोहन सिंग हे तेहतीस वर्षे खासदार होते. पंतप्रधान पदा व्यतिरिक्त त्यांनी अर्थमंत्री, विरोधी पक्ष नेता म्हणूनही काम पहिले. त्यांना आजवर अनेक सन्मानाने, पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते, त्यामध्ये पद्मविभभूषण, युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर, आशिया मनी पुरस्कार, जवाहरलाल जन्म शताब्दी पुरस्कार अशा काही महत्वपूर्ण पुरस्कारांचा समावेश आहे.